Sunday, April 20, 2025 06:27:12 AM

Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेसाठी महायुतीचे पाचही उमेदवार अखेर ठरले

महाराष्ट्र विधानपरिषदेची पोट निवडणूक येत्या 27 मार्च रोजी पार पडणारे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक होणारे.

vidhan parishad election 2025 विधानपरिषदेसाठी महायुतीचे पाचही उमेदवार अखेर ठरले

महाराष्ट्र: महाराष्ट्र विधानपरिषदेची पोट निवडणूक येत्या 27 मार्च रोजी पार पडणारे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक होणारे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेषच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपला 3, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली आहे. यात  भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. यानंतर शिवसेनेकडून आज उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आलीय. 

हेही वाचा: औरंगजेबाच्या कबरीचा वाद आणखी पेटला

शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अनेक जण या जागेसाठी इच्छुक होते. पण शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांची नावं देखील चर्चेत होते. पण एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे नाव फायनल केले. चंद्रकांत सूर्यवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रीय आहेत. 

काय असू शकतात पोटनिवडणुकीचे कारण: 
महाराष्ट्र विधानपरिषदेची पोट निवडणूकत्या परिस्थितीत घेतली जाते जेव्हा विधानपरिषदेमध्ये सदस्यांची संख्या कमी होईल किंवा सदस्यांचा कार्यकाळ संपेल. पोट निवडणूक मुख्यतः खालील कारणांमुळे घेतली जाते:

सदस्यांचे निधन: जर कोणत्याही सदस्याचे निधन होईल, तर त्याच्या जागी पोट निवडणूक घेतली जाते.
सदस्यांचा राजीनामा: जर एखाद्या सदस्याने राजीनामा दिला असेल, तर त्याच्या जागी पोट निवडणूक घेण्यात येते.
विधानपरिषदेच्या सदस्यता रद्द होणे: एखाद्या सदस्याची सदस्यता रद्द झाल्यास, त्या जागी पोट निवडणूक घेतली जाते.
खालच्या किंवा उच्च न्यायालयाने निर्णय घेतला असेल: कोणत्याही न्यायिक निर्णयामुळे सदस्यता रद्द झाल्यास किंवा कोणतीही अन्य परिस्थिती उद्भवल्यास, पोट निवडणूक घेतली जाते.या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेत इतर वेळेसारखीच प्रक्रिया केली जाते, आणि त्याद्वारे संबंधित सदस्यांचा पुनःनिर्वाचित होण्याचा मार्ग तयार होतो.


सम्बन्धित सामग्री