बीड : बीडच्या धारुरमधील तरुणाला मारहाण प्रकरण समोर आले आहे. आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेस्ट्स पाहायला मिळाले आहे. कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्येतील फरार आरोपी आहे. कराड-मुंडेंच्या बातम्या बघितल्यामुळे तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. आरोपी वैजनाथ बांगर, अभिषेक सानपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीड जिल्ह्यातील धारुरमधील तरनळी गावातील अशोक मोहिते या तरुणावर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील आरोपी वैजनाथ बांगर याच्या स्टेट्सला संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा फोटो पाहायला मिळाला. आरोपी कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा आशयाचा फोटो ठेवण्यात आलेला आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य
कराड आणि मुंडे यांच्या बातम्या पाहिल्यामुळे एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या समर्थकांकडून अशोक मोहिते नामक तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. कराड-मुंडेंच्या बातम्या बघितल्यामुळे अशा प्रकारे तरुणाला झालेली मारहाण संतापजनक आहे. या प्रकरणामुळे बीडमधील दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन
कोण आहे कृष्णा आंधळे?
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमध्ये चर्चेत आहे. मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह काही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. अद्याप आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. पोलिसांकडून आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे.