मुंबई : द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले आहे. लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन झाले आहे.
लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले आहे. गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईतील दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी झाला. त्यांचे शिक्षण किंग जॉर्ज स्कूल मध्ये झाले. ते आता राजा शिवाजी विद्यालय नावाने ओळखले जाते. त्यांचे महाविद्यालयीन रामनारायण रुईया महाविद्यालयात झाले. त्यांनी माटूंगा येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत कारकीर्द केली, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली.
हेही वाचा : पहिल्या पतीपासून विभक्त झालेली पत्नी दुसऱ्या पतीकडून मागू शकते पोटगी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
संझगिरींचे पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण
1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह 'एकच षटकार' हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. ज्यासाठी संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. 1980 दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरींनी आज दिनांक, सांझ लोकसत्ता, मिड-डे, तरुण भारत, पुढारी आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करायला सुरुवात केली. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ खूप गाजले. संझगिरी हे 25 वर्षांहून अधिक काळ सामना या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रिकेट स्पर्धा कव्हर करत होते.
हेही वाचा : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.