स्वतःच्या हक्काची खोली, घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी अनेकजण रात्रंदिवस कष्ट घेत असतात. तुम्हीही घर, बंगला, जमीन किंवा दुकानाचा गाळा अशा कोणत्याही प्रॉपर्टीत गुंतवणूक करणार असाल, तर अतिशय सावध राहणे गरजेचे आहे.
रजिस्ट्रेशनच्या वेळी अशा 5 चुका आहेत ज्या चुकूनही करू नका, कारण एकदा सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सही झाली की त्या चुका दुरुस्त करण्याची संधी पुन्हा मिळत नाही. त्यामुळे सही करण्याआधी ही चेकलिस्ट एकदा नक्की तपासून पहा.
2. रेडी रेकनर रेटपेक्षा कमी किंमत दाखवून स्टॅम्प ड्यूटी वाचवण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने तुम्ही भविष्यात मोठ्या अडचणीत येऊ शकता. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे योग्य मूल्यावरच स्टॅम्प ड्यूटी भरा.
3. इंडेक्स-II निघायला वेळ लागतो म्हणून त्याची प्रत न घेण्याची चूक करू नका. रजिस्ट्री झाल्यावर लगेचच इंडेक्स-II ची प्रत मागून घ्या आणि स्वतःजवळ ठेवा. हाच तुमच्या मालकीचा सर्वात मोठा पुरावा आहे. तो तिथेच सोडून नंतर घेतो, असे म्हणून जाऊ नका.
4. साक्षीदारांचे आयडी न तपासणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. तुम्ही सोबत नेलेल्या साक्षीदाराचे नाव, पत्ता आणि ओळखपत्राची माहिती अचूक भरली आहे का, हे तपासा. भविष्यात काही वाद झाल्यास हेच कागदपत्र महत्त्वाचे ठरते.