Friday, March 21, 2025 08:34:47 AM

मुंबईतील धारावीनंतर अदानी समूहाने 'या' प्रकल्पासाठी लावली 36,000 कोटींची बोली

हा प्रकल्प गोरेगाव (पश्चिम) च्या उपनगरीय भागात 143 एकरवर पसरलेला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीपीएल) ने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणारी.

मुंबईतील धारावीनंतर अदानी समूहाने या प्रकल्पासाठी लावली 36000 कोटींची बोली
Adani Group
Edited Image

मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या अदानी समूहाने आता मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी 36,000 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली आहे. मोतीलाल नगर-1, 2 आणि 3 हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प गोरेगाव (पश्चिम) च्या उपनगरीय भागात 143 एकरवर पसरलेला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीपीएल) ने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणारी. या प्रकल्पासाठी वाटप पत्र (LOA) योग्य वेळी अदानी समूहाला जारी केले जाईल.

हेही वाचा -अदानी समूहाला मोठा दिलासा! धारावी प्रकल्पाचे काम थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

अदानी ग्रुप कंपनीने तिच्या जवळच्या प्रतिस्पर्धी एल अँड टी पेक्षा जास्त बिल्ट-अप एरिया देऊ केला, ज्यामुळे कंपनीला हे कंत्राट मिळाले. कंपनीने 3.97 दशलक्ष चौरस मीटर बिल्ट-अप क्षेत्र एमएमएचडीएला देण्यास सहमती दर्शविली, तर एल अँड टीने 2.6 दशलक्ष चौरस मीटर बिल्ट-अप क्षेत्र देण्याचा प्रस्ताव दिला. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर हा प्रकल्प अदानी समूहाचा दुसरा मोठा प्रकल्प असेल. अदानी ग्रुप मोतीलाल नगरला आधुनिक फ्लॅट्सच्या क्षेत्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करेल. मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा एकूण अंदाजे खर्च सुमारे 36 हजार कोटी रुपये आहे. या पुनर्वसन प्रकल्पाला सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.

हेही वाचा -गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 27,800 कोटींची वाढ; नेमक काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

अदानी ग्रुप कंपनी जिंकली मोतीलाल नगरचा पुनर्विकास प्रकल्पाची बोली - 

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला बांधकाम आणि विकास एजन्सीमार्फत मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्यास मान्यता दिली होती. राज्य सरकारने याला 'विशेष प्रकल्प' म्हणून घोषित केले ज्याअंतर्गत म्हाडाचे नियंत्रण राहील. तथापि, अदानी ग्रुप कंपनीने 39.7 लाख चौरस मीटर क्षेत्र म्हाडाला देण्यास सहमती दर्शवून बोली जिंकली आहे. 

धारावीचा पुनर्विकास प्रकल्प - 

अदानी ग्रुप आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा पुनर्विकास करत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अदानी ग्रुपचा 80 टक्के हिस्सा आहे तर उर्वरित हिस्सा राज्य सरकारकडे आहे. 
 


सम्बन्धित सामग्री