Reciprocal Tariffs : ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणामुळे भारतीय निर्यातदारांचे 700 कोटींचे नुकसान होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी जो देश अमेरिकेवर जेवढे आयात शुल्क लावतो, तेवढेच आयात शुल्क त्या देशावर लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे.

Reciprocal Tariffs : ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणामुळे भारतीय निर्यातदारांचे 700 कोटींचे नुकसान होणार?

Reciprocal Tariffs : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. कॅनडा, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांना यापूर्वीच अमेरिकेच्या परस्पर आयात शुल्काचा (Reciprocal Tariffs) सामना करावा लागला आहे. आता 2 एप्रिलपासून भारतासह सर्व देशांना अमेरिका नवीन आयात शुल्क आकारणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत आणि इतर देशांनी अमेरिकेवर लादलेल्या टॅरिफवर टीका करत, 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. इतर देश अमेरिकेवर जितके टॅरिफ आकारतात तितकेच टॅरिफ अमेरिकाही इतर देशांवर आकारणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. याआधीच कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ (आयात शुल्क) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हिरे आणि दागिन्यांपासून ते औषध आणि ऑटोमोबाईल्सपर्यंत, अब्जावधींच्या घरात किंमत असलेल्या भारतातून होणाऱ्या निर्यातीला धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे व्यवसाय, नोकऱ्या आणि आर्थिक विकास धोक्यात येण्याच शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या जास्त शुल्क आकारण्याच्या धोरणामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसणार आहे. 

हेही वाचा – लंडन : खलिस्तान्यांनी जयशंकर यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत तिरंगा फाडला, भारताकडून प्रक्षोभक कारवायांचा तीव्र निषेध

अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात ट्रम्प म्हणाले की, इतर देशांनी वर्षानुवर्षे अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारले आहे आणि आता याला उत्तर देण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी विशेषतः भारताचा उल्लेख करून म्हटले की, भारत अमेरिकेतून होणाऱ्या वाहन आयातीवर 100% पेक्षा जास्त आताय शुल्क लादतो. ट्रम्प यांनी अधोरेखित केले की, परस्पर शुल्काची नवीन प्रणाली अमेरिकेसाठी व्यापार सुयोग्य बनवण्याच्या उद्देशाने आहे.

कॅनडा, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांना यापूर्वीच अमेरिकेच्या परस्पर आयात शुल्काचा सामना करावा लागला आहे. आता 2 एप्रिलपासून भारतासह सर्व देशांना अमेरिका नवीन आयात शुल्क लागू करणार आहे.

ट्रम्प यांच्या Reciprocal Tariffs भारताला मोठा फटका
अनेक आर्थिक तज्ज्ञांना असे वाटते की, भारताला अमेरिकेच्या या नवीन आयात शुल्कांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या मते, भारत आणि अमेरिका एकमेकांवर आकारणाऱ्या आयात शुल्कांत मोठा फरक आहे. भारत अनेक उत्पादनांवर अमेरिकेपेक्षा जास्त आयात शुल्क आकारतो. मॉर्गन स्टॅन्लेच्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, जर अमेरिकेने जर समान आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला तर भारत आणि थायलंड यांच्यावर अमेरिका आकारत असलेल्या आयात शुल्कांत 4 ते 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

काही विश्लेषकांनी असे म्हटले आहे की, अमेरिकन वस्तूंवरील भारताचे सरासरी आयात शुल्क, भारतीय उत्पादनांवर अमेरिका लादत असलेल्या शुल्कापेक्षा 10 टक्क्यांहून अधिक जास्त आहे. जर अमेरिकेने समान शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला तर भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

उद्योग क्षेत्राला फटका; दरवर्षी 700 कोटींचं संभाव्य नुकसान
ट्रम्प यांनी नवीन आयात शुल्कांची घोषणा केल्यामुळे ऑटोमोबाईल्स, रसायने आणि दागिने यासारख्या क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सिटी रिसर्चच्या अहवालानुसार या शुल्कांमुळे भारताला दरवर्षी सुमारे 7 अब्ज डॉलर्सचे (700 कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रसायने, धातू उत्पादने आणि दागिने या उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल, त्यानंतर ऑटोमोबाईल्स, औषधनिर्माण आणि अन्न उत्पादने यांचा क्रमांक लागतो. 2024 मध्ये भारताने अमेरिकेत एकूण सुमारे 74 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.

हेही वाचा – 'आर्टिकल 370 हटवलं, निवडणुका झाल्या; आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळायचाय..,' लंडनमध्ये जयशंकर यांचं मोठं विधान, जगाच्या भुवया उंचावल्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number