या संधीचं ‘सोने’ करा! ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरांत घसरण पाहायला मिळत आहे.
Gold Price
October Gold Rate

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरांत घसरण पाहायला मिळत आहे. नवरात्री-दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी ही संधी चालून आली आहे. सोने-चांदीच्या खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. कारण सोने-चांदीच्या भावातील ही मंदी जास्त काळ टिकणारी नाहीय, त्यामुळे ग्राहकांनी खरोखरच संधीचे सोने करायला हवे, असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळत असून, आजचे ताजे दर जाणून घ्या..

सोन्याचे दर-
1 ऑक्टोबर रोजी, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,240 रुपये आहे. तर प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 14,924 रुपये इतका आहे. आज सोनं 330 रुपये प्रति तोळा तर 3,300 रुपये प्रति 10 तोळा इतकं स्वस्त झालं आहे.

22 कॅरेट सोनं – 1,36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 13,680 रुपये प्रति ग्रॅम

18 कॅरेट सोनं – 1,11,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 11,193 रुपये प्रति ग्रॅम

हेही वाचा – मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गव्हाच्या MSP मध्ये 25 रुपयांची वाढ; आता प्रति क्विंटलला मिळणार ‘इतका’ दर

चांदीचे दर- 
आज  सोन्यासोबत चांदीचा भावही घसरला आहे. आज चांदी 5 हजारांनी स्वस्त होऊन 2,35,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. आजचा दर हा गेल्या 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त दर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version