UPI MDR Charges: UPI व्यवहारांवर आकारलेले MDR शुल्क वाचवता येईल? 2000 च्या वर पेमेंटवर करावी लागेल ‘अशी’ तरतूद

15 ऑक्टोबर 2026 पासून देशभरात UPI व्यवहारांवर MDR आकारला जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. P2M म्हणजेच ग्राहकाकडून व्यापाऱ्याला (Person to Merchant) केल्या जाणाऱ्या व्यवहारात हा MDR लागू असेल. त्यामुळे या व्यवहारात MDR या अतिरिक्त शुल्काचे आणि MDR सह त्यावर आकारण्यात येणाऱ्या 18% GST चे ओझे फक्त व्यापाऱ्याच्या खांद्यावर असेल

UPI MDR Charges: UPI व्यवहारांवर आकारलेले MDR शुल्क वाचवता येईल? 2000 च्या वर पेमेंटवर करावी लागेल ‘अशी’ तरतूद

15 ऑक्टोबर 2026 पासून देशभरात UPI व्यवहारांवर MDR आकारला जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. P2M म्हणजेच ग्राहकाकडून व्यापाऱ्याला (Person to Merchant) केल्या जाणाऱ्या व्यवहारात हा MDR लागू असेल. त्यामुळे या व्यवहारात MDR या अतिरिक्त शुल्काचे आणि MDR सह त्यावर आकारण्यात येणाऱ्या 18% GST चे ओझे फक्त व्यापाऱ्याच्या खांद्यावर असेल. ग्राहकांकडून MDR वसूल करण्यात येणार नाही. यामुळे व्यापारीवर्ग मोठ्या चिंतेत असून यावर तोडगे काढण्यात येत आहेत.

इंटरनेटवर 2000 पेक्षा जास्तीची रक्कम UPI द्वारे Pay करताना दोन-दोन हजारांच्या भागात विभागून MDR वाचवला जाऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. उदाहरणार्थ यात एखाद्या ग्राहकाने D-Mart मध्ये 10,000 रुपयांची शॉपिंग केली. अशात जर ग्राहकाने कॅश काउंटरवर UPI द्वारे 10,000 रुपये एकाच वेळी पे केले, तर 40 रुपयांच्या MDR चे ओझे एकट्या D-Mart च्या खांद्यावर पडेल. त्याचसोबत त्यावर आकारण्यात येणारी 18% GST म्हणजेच 7.2 रुपयेही D-Mart च्या खिशातून वसूल करण्यात येईल. एकूण 47.2 रुपये.

व्हायरल उपाय काय?

व्हायरल दाव्यानुसार जर ग्राहकाने हेच व्यवहार दोन-दोन हजारांच्या 5 भागांमध्ये विभागून एकूण दहा हजारांची UPI पेमेंट केली, तर D-Mart च्या खांद्यावरील अतिरिक्त शुल्काचे ओझे टाळता येऊ शकते. नियमांनुसार 2000 तसेच त्यापेक्षा कमी रकमेवर MDR लागू होत नाही. त्यामुळे 10,000 रुपयांची पेमेंट दोन हजारांच्या पाच टप्प्यात केली तर वरील व्यवहारात D-Mart च्या खिशातील 47.2 रुपये नक्कीच वाचू शकतात, असा दावा केला जात आहे.

Bank : ATM व्यवहार फ्री! बँकांचा संप सुरू होण्याआधी मोठा निर्णय; पण फायदा कोणाला?

मात्र हे व्यवहार ठरणार का गुंतागुंतीचे?
एखादी मोठी रक्कम दोन-दोन हजार रुपयांच्या भागांमध्ये विभागणे हे ग्राहक आणि दुकानदार दोघांसाठीही अडचणीचे ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीकडून एकाच व्यक्तीला किंवा एकाच व्यापाऱ्याला अनेक छोटे आणि सारखे व्यवहार होत असतील, तर बँका अशा व्यवहारांकडे संशयाच्या नजरेने पाहू शकतात. मुळात अशा व्यवहारांकडे सामान्य व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे भविष्यात बँकेकडून चौकशी होण्याची शक्यता असते. संशयास्पद पॅटर्न आढळल्यास ग्राहक व व्यापाऱ्याची सुरक्षा तपासणी होऊ शकते.

अशा प्रकारचे व्यवहार दुकानदारासाठी देखील अडचण ठरू शकतात. जर 10,000 रुपयांची UPI पेमेंट दोन-दोन हजार रुपयांच्या पाच भागांत केली, तर व्यापाऱ्याकडे पाच स्वतंत्र UPI एन्ट्री तयार होतील. एकाच ग्राहकाकडून जरी पेमेंट मिळाली असली तरी व्यवहाराच्या नोंदी पाच वेळा कराव्या लागतील. व्यवहाराची खात्री आणि तपासणीही पाच वेळा करावी लागेल. एकाच व्यवहा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number