महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ उपनगरीय विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ उपनगरीय विशेष गाड्या

मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे दि. ०५ आणि ०६.१२.२०२३ च्या मध्यरात्री (मंगळवार-बुधवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

तपशील खालीलप्रमाणे

मेन लाइन – अप विशेष
परळ -कल्याण विभाग:

कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

मेन लाइन – डाऊन विशेष
कल्याण – परळ विभाग:

परळ-ठाणे विशेष परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ येथून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – अप विशेष
पनवेल – कुर्ला विभाग:

वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन – डाऊन विशेष
कुर्ला – पनवेल विभाग:

कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version