मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये अतिरिक्त माती आणि धुळीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या परिसरात नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ही धुळीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्याने शिवाजी पार्क येथे एक विशेष डेमो घेण्यात आला. या डेमोमध्ये मैदानातील हवेत उडणारी माती आणि धूळ व्हॅक्यूमच्या सहाय्याने ट्रकमध्ये जमा केली जाते. या प्रयोगाने धुळ उडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खासदार शेवाळे यांनी केलेला हा डेमो यशस्वी झाला असून लवकरच अंमलबजावणीला सुरूवात केली जाणार आहे.