मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई रेल्वे स्थानकांतील ब्रिटिशांच्या खुणा असलेल्या रेल्वे स्थानकांचा नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी अद्याप ४ मुंबई रेल्वे स्थानकांची इंग्रजांनी दिलेली नावे ‘जैसे थे’ आहेत. मूळ प्रस्तावातील रे रोड, वांद्रे टर्मिनस, चर्चगेट, ग्रांट रोड, आणि नाशिक रोड ही नावे वगळण्यात आल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रे रोडला घोडपदेव, वांद्रे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चर्चगेटला बाळासाहेब ठाकरे, ग्रांट रोडला गावदेवी आणि नाशिक रोडचे नाशिक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे.