मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक जाहीर, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक जाहीर, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
Central Railway Mega Block

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यानच्या ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीम्या मार्गांवर तसेच पनवेल ते वाशी दरम्यानच्या ‘अप’ आणि ‘डाऊन’ हार्बर मार्गावर घेण्यात येईल.

सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे. त्यामुळे मुंबईतील मध्य रेल्वेच्या काही मार्गांवरील लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मेगा ब्लॉकच्या काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येऊ शकतात, तर काही गाड्या निर्धारित स्थानकांदरम्यान उशिराने किंवा बदललेल्या मार्गाने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या लोकलचे वेळापत्रक तपासून घेणे तसेच शक्य असल्यास पर्यायी वाहतुकीचा विचार करणे आवश्यक आहे.

यामुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे असतील:
मेन लाईन:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत धावतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या ‘डाऊन’ धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा ‘डाऊन’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर लाईन
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत धावतील. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर लाईन
पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या (अप) ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या (डाऊन) ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत रद्द राहतील. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी मार्गावर विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा उपलब्ध असतील. ब्लॉकच्या कालावधीत ‘पोर्ट’ मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number