अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचा कमबॅक! कल्याणसह ठाण्यात सरींचा शिडकावा

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाची हजेरी लावली आहे. मुंबईत जोरदार पावसाला सुरवात झाली असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain Update

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाची हजेरी लावली आहे. मुंबईत जोरदार पावसाला सुरवात झाली असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या फोर्ट, गिरगाव, नरिमन पॉईंट आणि मलबार हिल परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

तर दुसरीकडे ढगांच्या गडगटासह मुंबईच्या उपनगरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या उपनगरात मुलुंड, भांडुप, नाहूर, विक्रोळी आणि घाटकोपर विभागात पाऊस कोसळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असून काही दिवसापासून मुंबईत उन्हामुळे गर्मी झाल्यामुळे त्रस्त नागरिकांना आज पावसाने गारवा दिला आहे.

त्याचसोबत खोपोली आणि खालापूर परिसरात आज दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी; 8 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’, कुठे कसा पडेल पाऊस?

राज्यात पावसाचा जोर कमी होत असून मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. राज्यात पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, सांगली, सातारा या भागात तुरळक ठिकाणी तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात आता कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. अलनिनोचा प्रभाव सध्या पाहायला मिळत आहे. सध्या खरीप पिकामध्येच पावसाची सरासरी कमी असल्याने रब्बी पिक घेण्यासाठी जे शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. त्यांना ते शक्य होणार नाही त्यावेळेस पाण्याची भूजल पातळी किती असेल हे पाहून रब्बी हंगाम घ्यावा लागेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version