प्रतीक्षा संपणार! पनवेल-कर्जत लोकलच्या शुभारंभाबाबत मोठी अपडेट; डब्यांची संख्याही समोर

Panvel-karajt Local Train Update : पनवेल-कर्जत लोकल सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, दररोज ५० गाड्या धावण्याची माहिती समोर येत आहे. या नव्या रेल्वे सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. मात्र, या सेवेमागील महत्त्वाचे अपडेट्स आणि नियोजन जाणून घेण्यासाठी पुढे पाहा.
पनवेल ते कर्जत प्रवासाला मिळणार नवी गती
Panvel Karjat Local Train Service to Start Soon

लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पनवेल ते कर्जत दरम्यानचा बहुप्रतिक्षित असलेला लोकल मार्ग अखेर प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रवाशांचा दररोजचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा व्हावा यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. आता या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून हा मार्ग डिसेंबर महिन्यात सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.

कधीपासून करता येणार प्रवास?
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पनवेल-कर्जत या दुहेरी मार्गिकेचे काम हे यु्द्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत पाहिलं तर या प्रकल्पाचे काम हे तब्बल 99 टक्के पूर्ण झाले आहे. लोकल प्रवाशांना डिसेंबर पासून या मार्गावरुन प्रवास करता येऊ शकतो. या मार्गाच्या कामासाठी 2 हजार 782 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. सध्या या मार्गावर तांत्रिक चाचण्या सुरु असून या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मान्यता घेतली जाईल.

हेही वाचा-मुंबईत आंदोलकांचा एल्गार! तेजस ठाकरेंची राजकीय एन्ट्री? भाऊ आदित्य ठाकरेंसोबत पोलीस व्हॅनवर चढून ठोकला ठिय्या

किती डब्यांची लोकल धावणार?
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये या मार्गावर दररोज तब्बल 50 लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. प्रत्येक लोकल ही 12 डब्यांची असणार आहे, त्यामुळे पनवेल-कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘या’ स्थानकांचा समावेश
या 29 किलोमीटर असलेल्या स्थानकावर 5 स्थानके असणार आहेत. ज्यामध्ये पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत या स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेलहून कर्जतला जाण्यासाठी लागणारा वेळ जवळपास अर्ध्याने कमी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version