मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक आहे.
सीएसएमटी येथून सकाळी ११:०४ ते दुपारी २:४६ पर्यंत डाउन धीमी सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर लोकल वळविण्यात येईल. घाटकोपर येथून सकाळी ११:१४ ते दुपारी २:४८ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल. सकाळी ११:१६ ते दुपारी ४:४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०:४८ ते दुपारी ४:४३ वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.