Dagdi Chawl Politics : महापालिका निवडणुकीसाठी डॅडींच्या दोन्ही कन्या मैदानात; काकी विरुद्ध पुतणी असा रंगणार भायखळ्यात हायव्होल्टेज सामना

डॅडी स्वतः सक्रिय निवडणूक लढवणार नसले तरी, त्यांच्या वारसदार म्हणून त्यांच्या दोन्ही कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

Dagdi Chawl Politics : महापालिका निवडणुकीसाठी डॅडींच्या दोन्ही कन्या मैदानात; काकी विरुद्ध पुतणी असा रंगणार भायखळ्यात हायव्होल्टेज सामना

Dagdi Chawl Politics : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच दक्षिण मुंबईतील राजकारण तापू लागले आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ 'डॅडी' यांची दगडी चाळ पुन्हा एकदा राजकीय हालचालींचे केंद्र बनली आहे. डॅडी स्वतः सक्रिय निवडणूक लढवणार नसले तरी, त्यांच्या वारसदार म्हणून त्यांच्या दोन्ही कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा गवळी कुटुंबातच राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे.

भायखळ्यात काकी विरुद्ध पुतणी

भायखळ्यातील वॉर्ड क्रमांक 207 मध्ये यंदा काकी विरुद्ध पुतणी असा थेट संघर्ष होणार आहे. अरुण गवळी यांच्या भावजय वंदना गवळी यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे डॅडींच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र, आपला गड राखण्यासाठी डॅडींनी आपली दुसरी कन्या योगिता गवळी यांना वंदना गवळी यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. योगिता यांनी या वॉर्डातून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा – Prakash Mahajan : मनसेला रामराम केलेल्या प्रकाश महाजन यांनी हाती घेतलं धनुष्यबाण, शिवसेनेत केला प्रवेश

भायखळ्यावर अखिल भारतीय सेनेचे वर्चस्व

दरम्यान, भायखळ्यातील वॉर्ड क्रमांक 207 आणि 212 हे अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे बालेकिल्ले मानले जातात. डॅडींच्या थोरल्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी वॉर्ड क्रमांक 212 मधून पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामामुळे त्या मतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेना आपला उमेदवार देत नसे, परंतु यंदा समीकरणे बदलली आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीमुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – MNS-Shivsena UBT BMC Election 2026 : मुंबई मनपासाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार ठरला? वार्ड क्रमांकावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर मृत्यू प्रकरणात 18 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर अरुण गवळी यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. डॅडी तुरुंगाबाहेर आल्यामुळे अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य असून, याचा फायदा गीता आणि योगिता या दोन्ही भगिनींना निवडणुकीत मिळणार का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number