मोठी बातमी! मुंबई अँटिलिया बॉम्बकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन

मुंबई अँटिलिया बॉम्बकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन मंजूर झाला आहे.
Sachin Vaze
Sachin Vaze

मुंबई अँटिलिया बॉम्बकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन मंजूर झाला आहे. सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर मुंबईतील सत्र न्यायालयाकडून माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन मंजूर झाला आहे.

यावेळी राहत्या ठिकाणाचा पत्ता 7 दिवसांत NIAला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दर रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात दुपारी 12 ते 3 दरम्यान हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. साक्षीदारांशी संपर्क न करण्यासह पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

हेही वाचा- शेतकऱ्यांचा ठिय्या! हुबळीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन

दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला, मात्र अन्य प्रकरणात सचिन वाझे आरोपी असल्याने तुरुंगातच राहण्याची अधिक शक्यता आहे. कोर्टाचा सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही. मुंबईच्या विशेष NIA कोर्टाने 2021 सालच्या अँटिलिया बॉम्ब स्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आरोपी होते.

या प्रकरणात सचिन वाझे याच्यासहित माजी अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने, रियाजुद्दीन काजी यांच्या नावाचाही समावेश आहे. कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी आरोप निश्चित केल्यानंतर त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्या, खंडणी, पुरावा नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे या प्रकरणी खटला चालवण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version