मुंबईत आज 26 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. दोन प्रमुख बाजार संदर्भ असलेल्या GoodReturns आणि ऑल इंडिया बुलियन (AIB) – झवेरी बाजार या दोन्ही ठिकाणी सोने महागले आहे.
1. ऑल इंडिया बुलियन (AIB) – झवेरी बाजारचा दर (Live Rate – सकाळी 11:23 वाजता): हा मुंबईचा अधिकृत मेटल रेट मानला जातो.
– 24 कॅरेट – 14,472 रुपये प्रति ग्रॅम (1,44,722 रुपये प्रति 10 ग्रॅम)
– 22 कॅरेट – (916 हॉलमार्क) – 13,257 रुपये प्रति ग्रॅम (1,32,565 रुपये प्रति 10 ग्रॅम)
– 18 कॅरेट – 10,854 रुपये प्रति ग्रॅम
– चांदी – 2,01,668 रुपये प्रति किलो
आज मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या कालच्या बंद भावाच्या तुलनेत 392 रुपये प्रति 10 ग्रॅम (0.27 टक्के) वाढ झाली आहे, तर चांदी 49 रुपये प्रति किलोने (0.02 टक्के) स्वस्त झाली आहे.
बॉक्स रेट नुसार – 24 कॅरेटचा भाव 1,44,706 रुपये / 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा भाव 1,32,551 रुपये / 10 ग्रॅम आणि चांदी 2,01,475 रुपये / किलो आहे.
हॉलमार्क केलेल्या 22 कॅरेट दागिन्यांवर BIS मार्क, 22 कॅरेट 916 ग्रेड आणि सहा अंकी HUID कोड असतो. या दरावर दागिने घेताना मेकिंग चार्ज आणि 3 टक्के GST वेगळा लागतो. हा दर झवेरी बाजार, शेख मेमन स्ट्रीट येथून प्रसिद्ध केला जातो.
2. GoodReturns चा रिटेल दर:
– 24 कॅरेट – 14,275 रुपये प्रति ग्रॅम
– 22 कॅरेट– 13,085 रुपये प्रति ग्रॅम
– 18 कॅरेट- 10,706 रुपये प्रति ग्रॅम
गुडरीटर्न्सनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट दागिन्याचे गणित – मूळ किंमत 1,42,750 रुपये + मेकिंग चार्ज 12 टक्के (17,130 रुपये) + 3 टक्के GST (4,796 रुपये) = एकूण 1,64,676 रुपये.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
एकूण चित्र काय?
ऑल इंडिया बुलियनचा भाव हा शुद्ध धातूचा (Metal Rate) भाव आहे, तर GoodReturns चा भाव किरकोळ बाजारातील संदर्भ दर आहे. दागिने खरेदी करताना ग्राहकांना बुलियनच्या दरावर मेकिंग चार्ज आणि GST द्यावा लागतो.
दरम्यान, यंदा धनत्रयोदशी शुक्रवार 6 नोव्हेंबरला आणि दिवाळी रविवार 8 नोव्हेंबरला आहे, त्यामुळे ऐन सणासुदीच्या आधी सोने महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-