मुंबईत नवरात्रोत्सवाचा जल्लोष वाढणार! रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी, प्रशासनाची ‘ही’ महत्त्वाची अट

Mumbai Navratri Festival : मुंबईकरांसाठी नवरात्रोत्सवाबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा गरबा आणि दांडिया प्रेमींना रात्री उशिरापर्यंत उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, काही अटीही लागू असणार आहेत.
मुंबई नवरात्रोत्सव
Mumbai Navratri Festival

मुंबई : मुंबईकरांसाठी नवरात्रोत्सवाबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मुंबईत नवरात्र उत्सवात सलग तीन दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यापूर्वी दरवर्षी फक्त अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांसाठीच रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची सवलत दिली जात होती. मात्र, यंदा मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दिलेला आहे.

लाऊडस्पीकरबाबत नवा आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार, यंदा 17 ऑक्टोबर सप्तमीपासून ही सुट लागू होईल. म्हणजेच शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा आणि दांडिया या कार्यक्रमांमध्ये ध्वनिक्षेपक वापरता येणार आहे. त्यामुळेच मुंबईतील असंख्य गरबा प्रेमींना यंदा तीन दिवस सलग मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त गरबा खेळता येणार आहे.

हेही वाचा-आता लोकलला पर्याय ठरणार मेट्रो 4! चालकविरहित ट्रेनची तयारी; कुठून कुठे धावणार?

महत्त्वाची अट
नव्या निर्णयाचे नवरात्र मंडळांनीही स्वागत केलेले आहे. मात्र, ही परवानगी फक्त काही अटींवर देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये ध्वनी प्रदुषणाच्या निर्धारित केलेल्या मर्यादेचे पालन करणे अत्यंत गरजेचे असणार आहे. शिवाय सरकारने दिलेल्या घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये, म्हणजे रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसरात ही सवलत लागू होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामळेच यंदाचा नवरात्रोत्सव मुंबई शहरात अधिकच जल्लोषात आणि उत्साहात साजरा होणार आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version