गुड न्यूज! कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावर नव्या ई-बस धावणार; कधीपासून सुविधा सुरु होणार?

Kalyan Dombivli Electric Bus Service : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. KDMT च्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून, प्रवाशांना लवकरच या बसमधून प्रवास करता येण्याची शक्यता आहे.

गुड न्यूज! कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावर नव्या ई-बस धावणार; कधीपासून सुविधा सुरु होणार?
KDMT Adds 22 New Electric Buses

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या शहरातील सार्वजनिक वाहतूक ही अधिक सुरळीत आणि पर्यावरणपूरक व्हावी यासाठी केडीएमसीच्या ताफ्यात तब्बल 22 नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या नव्या ई-बस प्रवाशांच्या सेवेत नेमक्या कधी दाखल होणार आणि कल्याण-डोंबिवलीतील कोणत्या मार्गांवर धावणार आहेत.

पाहा संपूर्ण अपडेट
केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेला 100 ई-बस मिळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यापैंकी पहिल्या टप्प्यातील 22 बस या शहरात आल्या आहेत. या बस आठवडाभरापूर्वीच दाखल झालेल्या असून त्याची नोंदणी सुरु झाली. 22 पैकी 19 बस या कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली बस आगारामध्ये तर 3 बस या बिर्ला कॉलेज परिसरातील आगारात ठेवल्या आहेत.

हेही वाचा – आता लोकलला पर्याय ठरणार मेट्रो 4! चालकविरहित ट्रेनची तयारी; कुठून कुठे धावणार?

कधीपासून धावणार?
या बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम हे युद्दपातळीवर सुरु झालेले आहे. विशेष म्हणजे या बस चालवणाऱ्या अनेक चालकांना विशेष असे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. आरटीओ नोंदणी, चार्जिंग सुविधा तसेच प्रशिक्षण पूर्ण होताच या बस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर धावतील, त्यासाठी साधारण 2 ते 3 आठवडे लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number