२८ जुलै, २०२४,गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी लागली आहे. यामुळे, नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाद्वारे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाची रिप रिप सुरू होती. परंतु दुपारनंतर पावसाने वेग घेतला. त्यामुळे, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरणसाठा सोबतच परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची कामेही थांबलेली आहेत. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर अनेक नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.