मुंबईतील ICT महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; डॉक्टरांना शेवटचा मेसेज ..

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतील ICT महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; डॉक्टरांना शेवटचा मेसेज ..

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. IIT प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवासी होता. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सिद्धेश गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासातून जात होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.


नेमके काय घडले?

ही घटना काल रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिद्धेशने महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेतल्याचे समोर आले आहे. तसेच, स्वतःचे जीवन संपवण्याचे विचार मनात येत असल्याचा मेसेज त्याने डॉक्टरांना पाठवला होता. यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ सिद्धेशच्या मित्रांशी संपर्क साधून त्याच्याकडे जाण्यास सांगितले. मात्र, मित्र पोहोचण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी माटुंगा पोलीस पुढील तपास करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी IIT परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. आता ICT महाविद्यालयातील या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांना वेळेवर मदत मिळण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर..

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number