Kaun Banega Crorepati : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोराची कमाल, लाईफलाईनच्या मदतीशिवाय KBC मध्ये जिंकले 50 लाख

अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात पैठण तालुक्यातील कैलास कंटेवाड या शेतकऱ्याने उपस्थिती लावली होती.

Kaun Banega Crorepati : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोराची कमाल, लाईफलाईनच्या मदतीशिवाय KBC मध्ये जिंकले 50 लाख

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन सणासुदीदरम्यान, जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. इतकंच नाही, तर वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत काही मिनिटांच्या पावसामुळे पाण्यात गेले. यासह, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

अशा चिंताजनक वातावरणात एक आनंदाची बातमी पैठण तालुक्यातून समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात पैठण तालुक्यातील कैलास कंटेवाड या शेतकऱ्याने उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. 

नुकताच प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक उत्तरे दिली. कैलास यांनी सलग 11 प्रश्नांची बिनचूक उत्तरे दिली. मात्र, 12 व्या प्रश्नासाठी कैलास कंटेवाड  यांनी ऑडियन्स पोल ही एकमेव लाईफलाईन वापरली. त्यानंतर, त्यांनी पुढचे सर्व प्रश्न एकही चूक न करता  सोडवले. त्यामुळे, इतर लाईफलाईन त्यांच्या हातात राहिल्या. शेवटी, 50 लाख रुपयांच्या टप्प्यावर त्यांनी विजय मिळवला. 

हेही वाचा: Pune Police Commissioner Amitesh Kumar: पुण्यात पोलीस आयुक्तांसाठी केले रस्ते बंद; वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी व्यक्त केला संताप

दर महिन्याला केवळ 3 ते 4 हजार रुपयांची कमाई करणाऱ्या कैलास यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टप्पा आहे. एकेकाळी त्यांना क्रिक्रेटपटू बनून राष्ट्रीय संघात खेळाचे स्वप्न होते. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण आपल्या मुलांना क्रिक्रेटचे प्रशिक्षण देऊन हे स्वप्न ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी मुलांना क्रिक्रेट अकॅडमीमध्ये प्रवेशही दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number