Thursday, November 13, 2025 08:09:46 AM

Kalyan News : कल्याणमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळला; मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिलेला सुनावले

काल रात्री एका कल्याण येथील वसंत व्हॅली परिसरातील डी-मार्टमध्ये एका परप्रांतीय महिलेने मराठी भाषेवरून एका कर्मचाऱ्याशी वाद झाला.

kalyan news  कल्याणमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळला मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिलेला सुनावले

कल्याण: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद पाहायला मिळत आहे. काल रात्री एका कल्याण येथील वसंत व्हॅली परिसरातील डी-मार्टमध्ये एका परप्रांतीय महिलेने मराठी भाषेवरून एका कर्मचाऱ्याशी वाद झाला. 'माझ्याशी मराठीत नाही, हिंदीतच बोलायचं', असं परप्रांतीय महिला म्हणाली. त्यानंतर, डी-मार्टमधील कर्मचाऱ्यांनी 'मला मराठी येते, त्यामुळे मी मराठीत बोलणार नाही', असं प्रत्त्युत्तर दिलं. याप्रकरणी, जेव्हा मनसेने मध्यस्थी केली, तेव्हा परप्रांतीय महिलेने माफी मागितली. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

हेही वाचा: Fire In Kurla : कुर्ल्यात मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी, परिसरात धुराचं साम्राज्य

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 ते 10 वाजल्याच्या सुमारास कल्याण पश्चिम येथील डी-मार्टमध्ये एका परप्रांतीय महिला सामान खरेदी करण्यासाठी आली होती. यादरम्यान, त्या परप्रांतीय महिलेने काऊंटरवर असलेल्या एका कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याशी वाद घालताना प्ररप्रांतीय महिला म्हणाली की, 'माझ्याशी हिंदीत बोला, मराठीत नाही'. तेव्हा डी-मार्टमधील कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले की, 'मला मराठी येतं, त्यामुळे मी हिंदीत बोलणार नाही'.

मात्र, काही वेळानंतर संबंधित परप्रांतीय महिलेचा राग अनावर झाला. ती म्हणाली की, 'तुम्ही मराठी लोक कचरा आहात. तुम्ही आमच्या जीवावर जगता. आम्ही आहोत, म्हणून तुम्ही महाराष्ट्र विकला आहे'. हे ऐकताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा राग अनावर झाला. डी-मार्टमध्ये उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी संबंधित परप्रांतीय महिलेचा निषेध केला. सोबतच, या घटनेची माहिती मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली. मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिलेला सुनावले. इतकंच नाही, तर मनसे कार्यकर्त्यांनी तिला माफी मागायला सांगितले, अन्यथा बाहेर जाता येणार नाही, अशी ताकीद देण्यात आली. या घटनेनंतर, परप्रांतिय महिलेने हात जोडत सर्वांची माफी मागितली. 


सम्बन्धित सामग्री