Tuesday, January 20, 2026 05:04:07 AM

Aaditya Thackeray : 'तेव्हा पातळी सोडून टीका केली, आता तेच धोरण स्वीकारले!' नाईट लाईफवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

राज्य सरकारने या धोरणाचा अध्यादेश काढताच आदित्य ठाकरे यांनी 'मुंबईच्या नाईट लाईफ'च्या धोरणावरून झालेल्या वादाचा पुन्हा उल्लेख केला. यावरून उपहासात्मक प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

aaditya thackeray  तेव्हा पातळी सोडून टीका केली आता तेच धोरण स्वीकारले नाईट लाईफवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक संस्थांना आता 24 तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मद्य विक्रीशी निगडित ठिकाणे वगळता, उर्वरित दुकाने, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहे आठवड्यातील सर्व दिवस रात्रंदिवस चालवता येतील. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

जुने धोरण पुन्हा लागू
महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017' अंतर्गत उद्योग विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, बार, परमिट रूम आणि देशी दारूच्या दुकानांवर वेळेचे बंधन कायम राहील, पण 'नाईट इकॉनॉमी'ला प्रोत्साहन देण्यासाठी उर्वरित व्यवसायांना रात्रभर सुरू ठेवण्याची सवलत मिळाली आहे. या निर्णयामुळे मुंबईसारख्या 'कधीच न झोपणाऱ्या' शहराला अधिक चालना मिळेल.
कर्मचारी सुरक्षा महत्त्वाची : 24 तास व्यवसायाला परवानगी असली तरी, कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग 24 तासांची सुट्टी देणे सक्तीचे आहे, ज्यामुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण होईल. 

व्यापारी आणि नागरिकांना दिलासा
व्यापाऱ्यांकडून यापूर्वी पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांमुळे रात्रीच्या व्यवसायात अडथळे येत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन शासनाने कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. राजकीय नेत्यांच्या या टोमण्यांमुळे चर्चेला उधाण आले असले तरी, या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी वाढून व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - Abu Azmi On Marathi : 'मराठीची काय आवश्यकता...?, अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे आक्रमक

आदित्य ठाकरेंचा भाजपला प्रश्न
राज्य सरकारने हे धोरण स्वीकारताच आदित्य ठाकरे यांनी जुने वाद उकरून काढले. त्यांनी उपहासात्मक प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, "हे मजेशीर आहे. ज्या भाजपने माझ्या 'मुंबई 24/7' धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच भाजपने आता तेच धोरण स्वीकारले आणि त्याचा अध्यादेश पुन्हा काढला आहे."
ठाकरेंचा सवाल: "तेव्हा मी त्यांना विचारलं होतं आणि आजही पुन्हा तेच विचारतोय, कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाण्याची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे?"

आदित्य ठाकरे : नवा अध्यादेश कशासाठी?
जानेवारी 2020 पासूनच हे धोरण अस्तित्वात होते. तेव्हा भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. आता नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं, असा थेट सवालही आदित्य ठाकरेंनी केला.

या निर्णयामुळे महाराष्ट्राची व्यावसायिकतेचे वातावरण अधिक गतिमान होईल. मात्र, राजकीय नेत्यांच्या टोमण्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. व्यापारी आणि नागरिकांसाठी ही पावले दिलासादायक असली तरी अंमलबजावणी कशी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा - Uddhav Thackeray Dasara Melava 2025 : 'जनसुरक्षा कायदा हा हम करे सो कायदा,' सोनम वांगचूक देशभक्त; उद्धव ठाकरे कडाडले Video


सम्बन्धित सामग्री