मुंबई, १२ मे २०२४, प्रतिनिधी : मुंबईत रविवारी तीन रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेत माटुंगा ते मुलुंड वेगाने धावणार मार्गिकेवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी धावणाऱ्या अप-डाऊन लोकल सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेत देखील हा मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेत सातांक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे.