प्रवाशांनो लक्ष द्या! बस प्रवासाचा खर्च वाढणार, जाणून घ्या तिकीट किती रुपयांनी महागणार?

Bus Fare Hike : मिरा-भाईंदरमध्ये पीएम ई-बस योजनेतून आणखी 100 एसी बसेस दाखल होणार आहेत. मात्र, बससेवेचा वाढता खर्च आणि तिकीट उत्पन्नातील तफावत यामुळे महापालिकेसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले असून, प्रवाशांच्या खिशावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिरा-भाईंदरकरांच्या खिशाला कात्री लागणार
Bus Travel To Get Costlier In Mira-Bhayandar

मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची मोठी शक्यता आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेने बसच्या तिकीट दरात मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे.

किती पैसे मोजावे लागणार?
परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार, साध्या बसच्या भाड्यामध्ये तब्बल 1 ते 14 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीला पहिल्या 2 किलोमीटरसाठी 6 रुपये इतके भाडे प्रवाशांकडून आकारले जाते, जे खरं पाहिलं तर अन्य महापालिकांच्या तुलने 1 ते 4 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे या टप्प्यात 2 रुपयांची वाढ सुचवलेली आहे. याउलट एसी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

हेही वाचा-शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; जिल्हानिहाय लाभार्थींची आकडेवारी जाणून घ्या

एसी बसच्या भाड्यात 2 ते 45 रुपयांपर्यंतची कपात करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. सध्या पहिल्या 2 किमीसाठी एसची बसचे भाडे हे 20 रुपये आहे, जे इतर शहरांच्या तुलनेत पाहिलं तर 50 टक्क्यांनी जास्त आहे, त्यामुळेच पहिल्या टप्प्यात 5 रुपयांची कपात प्रस्तावित आहे. पालिकेची परिवहन सेवा ही 2005 पासून सुरु करण्यात आली होती. सध्या 74 डिझेल तर 57 इलेक्ट्रिक अशा एकूण 131 बसेस शहरात धावत आहे.

‘इतक्या’ एसी बसेस ताफ्यात दाखल होणार
शहरात लवकरच पीएम ई-बस या योजनेतून अजून 100 एसी बसेस ताफ्यात दाखल होणार आहे. बसच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिकेवर आर्थिक भार ही वाढला आहे. बसच्या तिकीटातून मिळणारे उत्पन्न आणि बस चालवण्याचा खर्च यामधील तफावत वाढत असल्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव आणल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version