Tuesday, November 11, 2025 10:10:36 PM

Monorail Accident in Mumbai : मोनोरेलचा अपघात! चाचणीदरम्यान डबा रुळावरून घसरला; मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने, या गाडीत प्रवासी नसल्याने मोठा जीवितहानीचा धोका टळला. अपघाताच्या वेळी केवळ चालक आणि एक अभियंता गाडीत होते. दोघांनाही अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले.

monorail accident in mumbai  मोनोरेलचा अपघात चाचणीदरम्यान डबा रुळावरून घसरला मोठी दुर्घटना टळली

Monorail Accident in Mumbai: वडाळा डेपो स्टेशनजवळ बुधवारी सकाळी मुंबई मोनोरेलच्या चाचणीदरम्यान भीषण अपघात घडला. मोनोरेलचा एक डबा रुळावरून घसरून हवेत लटकला. सुदैवाने, या गाडीत प्रवासी नसल्याने मोठा जीवितहानीचा धोका टळला. अपघाताच्या वेळी केवळ चालक आणि एक अभियंता गाडीत होते. दोघांनाही अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले.

हा प्रकार सकाळी अंदाजे 9 वाजता घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळ उडाला. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये मोनोरेलचा पहिला डबा हवेत लटकलेला स्पष्टपणे दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीनुसार, ही घटना मोनोरेलच्या सिग्नलिंग चाचणीदरम्यान घडली. ट्रेन रुळावरून घसरल्याने तिच्या अलाइनमेंट सिस्टमचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन्स लिमिटेडने या घटनेवर अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

हेही वाचा - Maharashtra Local Body Election : ठाकरेंच्या मोर्चानंतर आयोगाला जाग, दुबार मतदारांच्या नावापुढे 'डबल स्टार' देणार

प्रवासी सेवा आधीच बंद

मोनोरेल सेवेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने, 20 सप्टेंबरपासून प्रवासी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सध्या सिस्टम अपग्रेड आणि सुरक्षा तपासणी सुरू आहे.

हेही वाचा - Thane Train Accident Case: ठाणे रेल्वे अपघाताबाबत मोठी अपडेट! मध्य रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल

एमएमआरडीएकडून चौकशीसाठी समितीची स्थापना  

दरम्यान, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वीही 15 सप्टेंबर आणि 19 ऑगस्ट रोजी तांत्रिक बिघाडांमुळे शेकडो प्रवासी गाड्यांमध्ये अडकले होते. त्यामुळे एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षिततेसंबंधी सविस्तर चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या अपघातामुळे मुंबई मोनोरेलच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि रुळावरून घसरण्याच्या घटना प्रवासी सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.


सम्बन्धित सामग्री