मुंबईतील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या ‘या’ उपाययोजना; आता कचरा हा…

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

मुंबईतील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या ‘या’ उपाययोजना; आता कचरा हा…

नुकत्याच अमेरिकेतील ‘IQAir’ या जागतिक पर्यावरण संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील 122 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईने अवघ्या एका आठवड्यात पाचव्या स्थानावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाची सरकारने दखल घेतली असून, रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

वायुप्रदूषणाची नेमकी कारणे कोणती?

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामांच्या ठिकाणी साचलेले मलब्याचे ढिगारे, धूळ, उघड्यावर कचरा जाळणे, तसेच मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामातून निर्माण होणारी धूळ हवेत मिसळत आहे.औद्योगिक प्रकल्प आणि उत्पादन कारखाने हेदेखील वायुप्रदूषणाचे प्रमुख स्रोत मानले जातात. कारखान्यांमधून सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडसारखे प्रदूषक हवेत सोडले जातात. याशिवाय, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, डिझेल इंजिन, जुनी वाहने आणि वाहनांची योग्य देखभाल न केल्यामुळेही प्रदूषणात भर पडते.

मुंबई महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना राबवण्यात येणार?

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

  • बांधकामांसाठी नियम: बांधकामांदरम्यान धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने 28 नियम जारी केले आहेत.
  • कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई: उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, बेकऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
  • विशेष पथकांची नियुक्ती: तपासणीसाठी 36 विशेष पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाकडून किमान दोन बांधकामांच्या ठिकाणी अचानक तपासणी केली जाणार आहे.
  • सेन्सर बसवणे: 3,166 बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर बसवण्यात आले आहेत.
  • हवेच्या गुणवत्तेवर लक्ष: हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी निरीक्षण यंत्रणा उभारण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबईतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात? अनेक उपनगरांमध्ये AQI चा पारा 150 पार; जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत कितवा क्रमांक?

वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यावर निर्बंध आणि प्रदूषणाच्या स्रोतांवर देखरेख ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number