Mumbai Ganesh Visarjan : लालबाग-परळमध्ये बाप्पाच्या निरोपाची धूम! महाआरतीनंतर मिरवणूक, मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त

Mumbai Ganesh Visarjan : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील विसर्जन मिरवणुकांना सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. परळमधील प्रसिद्ध नरे पार्चत्या परळचा राजा मंडळाने ही आज पहाटेपासून उत्तर पूजेला सुरुवात केली आहे.
Mumbai Ganesh Visarjan : लालबाग-परळमध्ये बाप्पाच्या निरोपाची धूम! महाआरतीनंतर मिरवणूक, मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त
मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाची तयारी,

मुंबई : गेले दहा दिवस मुंबईच्या लालबाग-परळ परिसरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील विसर्जन मिरवणुकांना सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. परळमधील प्रसिद्ध नरे पार्चत्या परळचा राजा मंडळाने ही आज पहाटेपासून उत्तर पूजेला सुरुवात केली आहे.

बाप्पाच्या निरोपासाठी भक्त सज्ज
महाआरती झाल्यानंतर या मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. लालबाग-परळ भागातील ही पहिली मोठी विसर्जन मिरवणूक असणार आहे. त्यामुळेच भाविकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.दरम्यान, मुंबईतील लाखो भाविक हे बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याने मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

हेही वाचा-Ganesh Visarjan 2026 : विसर्जनानंतर अर्धवट मूर्तींचे फोटो काढाल तर सावधान! धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त
यावर्षी विसर्जनासाठी मुंबईत तब्बल 18,940 कर्मचारी आणि 3,213 अधिकारी हे तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत एक हजार पन्नास पोलीस प्रशिक्षणार्थीही बंदोबस्तात असणार आहे. 6 अतिरिक्त पोलीस आयुक्त,9 वरिष्ठ अधिकारी,28 डीसीपी आणि 66 एसीपी आजच्या या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून SRPF, Force One, QRT, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कमांडो आणि अँटी-ड्रोन पथकांचा सहभाग असेल.

असंख्य भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच ठिकाणी तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारले आहे. जुहू, गिरगाव चौपाटी, पवई तलाव या गर्दीच्या ठिकाणी विशेष कक्ष असतील. या वर्षी पहिल्यांदा AI आधारित मॉनिटरिंग प्रणालीचा वापर करुन सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा-Solapur News : सोलापुरात गणेश विसर्जनाची लगबग; भक्तांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या चौपाट्यांवर मोठ्या स्क्रीनवर सूचना दिल्या जातील. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बऱ्याच ठिकाणी नो-पार्किंग तसेच वाहतूक वळवण्यात आलेली आहे. रेल्वे स्थानकांवरही 24 तास विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version