मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे आज अधिक उशिराने धावत असल्याचे दिसून आले. साधारणपणे तिन्ही मार्गांवर लोकल 2 ते 5 मिनिटे उशिराने धावतात, मात्र आज मध्य रेल्वेवर तब्बल 15 मिनिटे ते 1 तास उशिराने लोकल धावत होत्या. विशेषतः मुलुंड ते ठाणे दरम्यान मोठा विलंब पाहायला मिळाला.
नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेमक्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरदार वर्गाला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लोकल तासभर उशिराने धावत असल्याने कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. काही प्रवाशांनी वैतागून थेट रेल्वे रुळावर उतरून पायी प्रवास केल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, या घटनेचा पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर अद्याप परिणाम झालेला नाही.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
आता मध्य रेल्वेची वाहतूक कधी पूर्ववत होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, जर वाहतूक लवकर सुरळीत झाली नाही, तर सायंकाळी परतीच्या प्रवासातही प्रवाशांना अशाच विलंबाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-