‘मी खरंच वाट बघतोय…महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय…’; राज ठाकरेंचं मोठं विधान

नवी मुंबईत मनसेच्या वाहतूक मेळाव्याला राज ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी वाहतूकदारांच्या समस्यांना हात घातला.

‘मी खरंच वाट बघतोय…महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय…’; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray

नवी मुंबई : नवी मुंबई येथे मनसेतर्फे आयोजित मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील वाहतूक समस्येवर उपस्थितांना संबोधित केले. आपल्या देशात वाहतुकीची समस्या अत्यंत वाईट आहे. कुणाचा कशाशी पायपोस नाही. रस्त्याने धड चालताही येत नाही, अशा कडक शब्दांत सुनावले. तसेच हे राज्य माझ्या हातात द्या, असा पुनरोच्चारही त्यांनी यावेळी केला. राज ठाकरे म्हणाले की, आपल्या शहरांना आकार नाही. आपल्याकडे बागा नाहीत. आपल्याकडे शिस्त नाही. आणि सांगणार जीडीपी वाढला. काय चाटायचा का? आपले तलाव बुजवले जात आहेत. तिकडे वस्त्या उभ्या राहतात, त्यांना टँकरने पाणी दिलं जातं, असा संताप व्यक्त करतानाच महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, त्याची मी वाट बघतोय. खरंच वाट बघतोय. अशा प्रकारची शिस्त लावणे हे काही रॉकेट सायन्स नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगेंची ED चौकशीची मागणी; म्हणाले, ‘तुमची यंत्रणा काय करते…’

काय म्हणाले राज ठाकरे 

मी आता काही आपल्या वाहतूकदार बांधवांशी बोललो. त्यांचे प्रश्न समजून घेतले. वाहतूकदारांशी चर्चा केली. त्यातील एक प्रश्न वाहतुकीशी होता. मी अनेकदा भाषणात हा विषय काढला आहे. आता ईचलानचा विषय काढला. ईचलानला विरोध नाही. पण ज्या प्रकारे ईचलान लावले जातात त्या गोष्टी तपासल्या पाहिजे. ईचलान कॅमेऱ्यावर आले पाहिजे. कोणी तरी व्यक्तीश: जातो आणि ईचलान फाडतो, असं होता कामा नये. आज देशातील वाहतुकीचा प्रश्न इतका गंभीर आहे. त्यावर मी अनेकदा बोललो आहे. ही समस्या पुढे अक्राळविक्राळ होणार आहे. आताही झालेली आहे. कोणत्याही गोष्टीची बंधनं नाहीत, ही समस्या सोडवण्यासाठी चौकट आपल्याकडे घातली गेली नाही. एक लेखक म्हणाला होता, तुमच्या देशातील लहान मुलं कोणत्या प्रकारची गाणी गातात ते सांगा. मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. आपल्या देशातील लोकं बिडी जलायले म्हणत असतील तर काय भविष्य असेल? तसंच सांगतो. आपल्या वाहतुकीवरून आपल्या देशाचं भवितव्य दिसतं. आकार उकारच नाही. कुठेही गाड्या पार्क केल्या जातात. आपल्याकडे फक्त पुल बांधले जातात. परत दोन वर्षात कामे निघावीत म्हणून रस्ते बांधले जातात.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number