मेट्रो प्रवाशांसाठी मोठा दिलासा! डब्यांची संख्या वाढणार; ‘या’ मार्गावर धावणार 6 डब्यांची मेट्रो

मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे मेट्रो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
मेट्रो प्रवाशांसाठी मोठा दिलासा! डब्यांची संख्या वाढणार; ‘या’ मार्गावर धावणार 6 डब्यांची मेट्रो

मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे मेट्रो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण लोकलच्या गर्दीपेक्षा सुकर व अधिक जलद प्रवास हा मेट्रोद्वारे होतो. मात्र आता मेट्रोच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाल्याने सकाळ व संध्याकाळच्या सुमारास मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते.

यावर उपाय म्हणून आता घाटकोपर – वर्सोवा मेट्रो 1 वर 2 अधिक डबे वाढवण्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता मेट्रो 6 डब्यांची होणार असून प्रवाशांचा कोंडमारा होणार नाही. यासाठी 22 डबे खरेदी करण्याची प्रक्रिया मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (MMOPL) सुरू केली आहे.

हेही वाचा – विमान प्रवास पुन्हा महागला! इंडिगोकडून फ्युएल सरचार्जमध्ये वाढ; मात्र, या प्रवाशांना दिलासा

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रोची क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार
सुमारे 11.4 किलोमीटर लांबीच्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो मार्गावर दररोज 4.5 ते 5 लाख प्रवासी प्रवास करतात. सध्या या मार्गावर 4 डब्यांच्या मेट्रो ट्रेन धावतात, ज्याची प्रवासी क्षमता 1,178 इतकी आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या मार्गावरील मेट्रोला आणखी 2 डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 डबे वाढल्यानंतर मेट्रोची प्रवासी क्षमता 1,794 पर्यंत वाढणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version