लोकलच्या तिन्ही लाईनवर प्रवाशांची वाढती वर्दळ पाहता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण आणि प्रवासी क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने MRVC ने विविध प्रकल्पांच्या कामांना गती दिली असून, अनेक महत्त्वाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ –
मुंबईसाठी 238 वातानुकूलित लोकलची निर्मिती करण्यासाठी MRVC आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांच्यात सप्टेंबर महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला. या लोकलचा पुरवठा 2027 च्या अखेरच्या तिमाहीत सुरू होणार असून, 2030 पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
इतर पूर्ण होत आलेली कामे –
पनवेल-कर्जत दरम्यान 29.6 किलोमीटर लांबीच्या नवीन दुहेरी उपनगरीय मार्गिकेचे 99 टक्के भौतिक काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
या प्रकल्पांतर्गत सर्व पूल आणि रेल्वे उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली असून, बोगद्यांचे खोदकाम आणि अस्तरीकरणही पूर्ण झाले आहे. एकूण 69.70 किमी पैकी 68.70 किमी लांबीच्या मार्गावर रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा – विमानतळापर्यंतचा प्रवास आता खिशाला परवडणारा, NMMT ने घेतला मोठा निर्णय
तसेच उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांची वर्दळ हाताळणे आणि प्रवासी सुविधांचा विस्तार करणे यासाठी विरार, नालासोपारा, घाटकोपर, दादर आणि वसई रोड या स्थानकांवर उन्नत डेकच्या बांधकामासाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या तुळ्या बसविण्यात आल्या.
उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) तपासणी केली जाईल. त्यानंतर मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया पार पडेल.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.