आंदोलनाचे नेते अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचे खूप कौतुक केले आहे. जनआंदोलनाचे नेतृत्व करत असताना त्यांनी मुंबई पोलीस हे देशातील सर्वात चांगले पोलीस आहे, असे म्हचले आहे. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांना त्यांनी लाडाने ”OG Pookie” आणि ”कुच्चू पुच्चू” असे म्हटलं आहे.
दिपके म्हणाले, मला अटक करण्याचा आदेश दिला होता, तरी मुंबई पोलिसांनी मला चहा दिला आणि चांगली वागणूक दिली. त्यांनी मी करत असलेला कामाला पाठिंबा ही दिला. शिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे. जंतरमंतरवर आम्हाला अडवले आणि अटक केली म्हणून ते नाराजही झाले. त्यानंतर त्यांनी अधिकार सचिन शर्मा सह काहींवर टीका केली. सध्या या आंदोलनात गायक विशाल दललानी पण सहभागी झाले होते.