CJP चे नेते अभिजित दीपके व अजिंक्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल जंतर-मंतरहून आशुतोष रांका व सौरव दास यांना अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी नसताना सीजेपीचे नेते तेथे दिसल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावरून माध्यमांशी बोलताना, अजिंक्य शिंदे व अभिजित दीपके यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.
मात्र मुंबईतील विद्यार्थी संघटनांनी CJP नेत्यांच्या अटकेचा जाहीर निषेध केला आहे. काल 14 ऑक्टोबर, बुधवार रोजी विद्यार्थी संघटनांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिरंगा फडकावला. तसेच आशुतोष रंका आणि सौरव दास यांच्या तात्काळ सुटकेची मागणी देखील करण्यात आली.
हेही वाचा – मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’, अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा
विद्यार्थी संघटनांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रध्वज फडकवणे हा अटकेचा आधार ठरू नये. त्यामुळे अटक केलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, SIR प्रक्रिया रद्द करणे आणि निवडणूक आयोगात सुधारणा करणे, अशी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली आहे.
तसेच, विद्यार्थी संघटनांनी 16 ऑक्टोबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.