मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’, अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा

अभिजीत दिपके आणि त्यांच्या CJP पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यासाठी अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जात असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन गायिका मिलबन यांनी केला आहे.

मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’, अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा
Abhijit Dipke

Mary Millben accuses Abhijeet Dipke and CJP of receiving US funding to oppose PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्ठावान समर्थक आणि प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबन यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि अभिजीत दिपके यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दिपके आणि त्यांच्या CJP पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यासाठी अमेरिकेतील काही निवडक देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी (Funding) पुरवला जात असल्याचा दावा मिलबन यांनी केला आहे. याआधीही CJP च्या फंडिंगबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते, परंतु आता एका आंतरराष्ट्रीय गायिकेने उघडपणे भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘विघटनकारी शक्ती भारताच्या विकासाला लक्ष्य करत आहेत’; मेरी मिलबन यांची ‘एक्स’वरील पोस्ट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एक सविस्तर पोस्ट शेअर करत मेरी मिलबन यांनी भारताच्या तरुण पिढीला उद्देशून आपले विचार मांडले. त्यांनी लिहिले की, ‘माझ्या तरुण देशभक्तांनो, तुमचे पंतप्रधान सलग 3 वेळा निवडून येत गेल्या 25 वर्षांपासून भारताची सेवा करत आहेत आणि माझ्या देशातील विघटनकारी शक्तींपुढे ते कधीही झुकणार नाहीत.’ पुढे बोलताना त्यांनी असा दावा केला की, जागतिक पातळीवरील हे देणगीदार जगभरातील पुराणमतवादी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या तरुणांना हेरतात, त्यांना कट्टरपंथी बनवून त्यांच्याच देशात अनागोंदी पसरवण्यासाठी वापरतात.

हेही वाचा – एलॉन मस्कला ‘पंतप्रधान अंबानी’ हा शब्दप्रयोग भोवला; महाराष्ट्रात सरकार आक्रमक, टेस्लाला मिळणाऱ्या कर सवलतींचा आढावा घेण्याचे निर्देश

भारतीय तरुणांनी CJP च्या विरोधात एकत्र येण्याचे मिलबन यांचे आवाहन

भारताच्या लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आता एका नव्या प्रति-चळवळीची (counter-movement) नितांत गरज असल्याचे मिलबन यांनी म्हटले आहे. भारताच्या मातीत जन्मलेला, वाढलेला आणि तिथेच शिक्षण घेतलेला एक खरा आवाज पुढे येऊन CJP च्या या विघटनकारी आंदोलनाचा शांततापूर्ण मार्गाने विरोध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे देशातील तरुण पिढीने पुढे येऊन याविरुद्ध आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी भारतीय तरुणांना केले आहे.

याआधीही मेरी मिलबन यांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ केले होते कौतुक

मेरी मिलबन या एक प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन गायिका आणि हॉलिवूड अभिनेत्री असून त्यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे. वर्ष 2022 मधील भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि 2023 मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रगीत तसेच ‘ओम जय जगदीश हरे’ हे गीत गाऊन विशेष लोकप्रियता मिळवली होती. आता त्यांच्या या नव्या दाव्यामुळे देशांतर्गत राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number