नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या बहुप्रतीक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे असंख्य प्रवाशांचा प्रवास हा अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. सध्या सर्वांच्या लक्ष ते या प्रकल्पाच्या सद्यस्थितीच्या कामाला लागले आहे.
पनवेल-कर्जत लोकलचा मुहूर्त कधी
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित पनवेल आणि कर्जत या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम हे आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. तब्बल 29.6 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गात आता 99 टक्के इतके काम झाले असल्याची माहिती मिळत आहे. तर डिसेंबर 2026 पर्यंत उर्वरित काम संपवण्याचे उद्दिष्ट मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ठेवले आहे.
इतका वेळ वाचणार
एमयुटीपी 3 अंतर्गत हा 2,782 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे पनवेल ते कर्जत असा प्रवासाचा वेळ हा थेट दीड तासावरुन आता अवघ्या 40 मिनिटांवर येणार आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मार्गावर असलेल्या तीनही बोगद्यांचे खोदकाम, लायनिंग तसेच बॅलास्टेलस ट्रॅक टाकण्याचे काम हे शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मात्र आता मार्गावरील इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल सिस्टीम बसवण्याचे काम सुरु आहे. नियोजित असलेल्या 69.7 किमी पैकी 68.7 किमी ट्रॅक जोडणी पूर्ण झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे खालील भुयारी मार्ग आणि पनवेल, चौक, मोहापे येथील ट्रॅक बदलाचे कामही पूर्ण झाले आहे.
अशी असतील स्थानके
महत्त्वाचे म्हणजे, या 29.9 किमी मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत अशी 5 स्थानके असणार आहेत. पनवेलची नवीन स्टेशन इमारत कार्यान्वित झाली असून चिखले, मोहापे आणि चौक येथील इमारती व सबवे तयार झाले आहेत.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.