Saturday, July 20, 2024 12:58:15 PM

Railway News
राहुलचा खोटेपणा रेल्वे बोर्डानं आणला समोर

राहुलचा खोटेपणा रेल्वे बोर्डानं समोर आणला. पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांना विश्रांती घेण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा दिल्या असल्याची माहिती दिली.

राहुलचा खोटेपणा रेल्वे बोर्डानं आणला समोर 

मुंबई :  काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी रेल्वेच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांच्यासाठी पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांना विश्रांती घेण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा दिल्या असल्याची माहिती दिली. 

गाडी सुरक्षितरित्या आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढे नेणे तसेच सर्व प्रवाशांची काळजी घेणे अशी दुहेरी जबाबदारी लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांच्यावर असते. यामुळे ठराविक तास काम केल्यानंतर लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर विश्रांती देणे त्यांच्या कामाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हीच बाब लक्षात ठेवून पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांना विश्रांती घेण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा दिल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेच्या हद्दीत लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांच्यासाठी बारा वातानुकुलित मोठ्या खोल्यांचा विश्रांती कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात ५६ कर्मचाऱ्यांसाठी ५६ बेडची व्यवस्था आहे. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची तसेच नाश्त्याची व्यवस्था पण आहे. लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांना वाचनासाठी वाचनालयाची सोय करुन देण्यात आली आहे. या कक्षात गरम पाण्याची व्यवस्था, डीप फ्रीझर, पायांना मालीश करणारे यंत्र, बूट पॉलिश यंत्र, कपडे सुकवण्याचा स्टँड अशा अनेक आधुनिक सोयीसुविधा आहेत. 


सम्बन्धित सामग्री