मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक होणार आहे. लोअर परळ येथे ही बैठक होणार आहे. संघाच्या मुख्यालयात 18,19 जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीची रक्कम जमा होणार; मंत्री तटकरेंनी दिली माहिती
भाजपाच्या इतर मंत्र्यांसह नवीन कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संघ परिवार आणि सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी यशवंत भवन येथे होणार चर्चा आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी संघाचा कानमंत्र आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आमदारांची शाळा घेतली आणि त्यानंतर आता संघ भाजपाची शाळा घेणार आहे.