Sunday, November 16, 2025 05:21:59 PM

Sanjay Raut : 'मी यातून लवकरच बाहेर पडेन...'; संजय राऊत यांनी स्वतःचं दिली प्रकृतीची माहिती, पंतप्रधान मोदींचेही मानले आभार

sanjay raut  मी यातून लवकरच बाहेर पडेन संजय राऊत यांनी स्वतःचं दिली प्रकृतीची माहिती पंतप्रधान मोदींचेही मानले आभार

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आपल्या प्रकृती अस्वस्थ संबंधीत माहिती दिली आहे. त्यांनी स्वतः एक्स पोस्टवर पत्रक शेअर करत. तब्येतीची अपडेट दिली आहे. संजय राऊत यांनी सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती करत हे पत्र लिहिले आहे. “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा : Bharat Gogawale Masterstroke : शिवसेना vs भाजप! रायगडमध्ये गोगावलेंचा मास्टरस्ट्रोक; भाजपच्या रवी मुंढेंचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर संजय राऊत यांनीही पंतप्रधानांच्या ट्वीटला उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. 


सम्बन्धित सामग्री