मुंबई: ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील लाखो भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवसासाठी १४ डब्यांच्या विनाआरक्षण विशेष रेल्वे गाड्या आणि १२ विशेष उपनगरीय लोकल गाड्यासोडण्यात येणार आहेत.
विशेष उपनगरीय लोकल गाड्या ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान धावणार आहेत. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल. रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकात प्रवाशांसाठी मर्यादित प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. ५ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून ६ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत ही मर्यादा लागू राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे.
प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, तसेच गर्दीच्या वेळी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात, त्यामुळे कोणतीही अडचण भाविकांना होऊ नये आणि