Wednesday, November 19, 2025 01:39:50 PM

Congestion Fee For Vehicles : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! MMRDA ने लढवली 'आयडीयाची कल्पना', भन्नाट प्लान आखला

रोजगारासाठी किंवा इतर कारणांसाठी अनेकजण मुंबईत वास्तव्य करतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत राहणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

congestion fee for vehicles  मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार mmrda ने लढवली आयडीयाची कल्पना भन्नाट प्लान आखला

मुंबई: रोजगारासाठी किंवा इतर कारणांसाठी अनेकजण मुंबईत वास्तव्य करतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत राहणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस मुंबईकर वाहतूक समस्यांच्या सामोरे जात आहे. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक नवा प्रस्ताव मांडला आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात 50 मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबतात, अशा वाहनांवर 'कंजेशन फी' म्हणजेच वाहतूक शुल्क आकारण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली आहे. 

बीकेसी हा मुंबईतील सर्वांत गजबजलेला बिझनेस हब असून, याठिकाणी अॅपल, टेस्ला यांसारख्या नामांकित कंपन्यांची कार्यालये आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात बरेच लोक काम करतात, तर मोठ्या संख्येने लोक येथे भेट देतात. त्यामुळे, दिवसेंदिवस या परिसरात ट्रॅफिकचा ताण वाढत आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनचालक बीकेसीचा वापर शॉर्टकट म्हणून करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढते. अशा वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'कंजेशन फी' म्हणजेच वाहतूक शुल्क आकारण्याची योजना एमएमआरडीएने राबवण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला हे शुल्क फक्त चारचाकी वाहनांना लागू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या शुल्कामुळे वाहनचालकांना अनावश्यकपणे बीकेसीमधून जाण्यापूर्वी विचार करावा लागेल, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल'. सध्या बीकेसी आणि आसपासच्या भागात काही पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

हेही वाचा: Mumbai Metro 3 Phase: मेट्रो 3 आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु; काय आहेत तिकीटाचे दर? जाणून घ्या

जर ही योजना अमलात आली, तर बीकेसी हा देशातील पहिला असा परिसर ठरेल, जिथे ‘कंजेशन फी’ प्रणाली लागू होईल. लंडन, सिंगापूर, न्यू यॉर्क आणि स्टॉकहोल्मसारख्या शहरांमध्ये अशा योजना आधीपासूनच यशस्वीपणे राबविल्या जात आहेत.  या योजनेबाबत, एमएमआरडीए आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असून आता अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री