‘काळजी करू नका…’; उद्धव ठाकरेंचा पूर्णेकर कुटुंबीयांना धीर,दिलं मोठं आश्वासन

Pradip Purnekar Case : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांची सांत्वनपर ही भेट घेतली. याचवेळी त्यांनी पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांच्याशी संवाद साधला.

‘काळजी करू नका…’; उद्धव ठाकरेंचा पूर्णेकर कुटुंबीयांना धीर,दिलं मोठं आश्वासन
पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात उद्धव ठाकरे सहभागी

ठाणे शहरात शिवसेना ठाकरे गटाते कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच काल आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांनी पोलीस ठाण्यात जात एफआयआरची मागणी केली होती.

हेही वाचा-प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात महिला कनेक्शन उघड; मुख्य आरोपीच्या संपर्कातील 3 महिला पोलिसांच्या ताब्यात

त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांची सांत्वनपर ही भेट घेतली. याचवेळी त्यांनी पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांच्याशी संवाद साधला. ‘आम्ही तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहोत, कुटुंबाला न्याय नक्कीच मिळवून देऊ, असे अश्वासन दिले” शिवाय या गुन्ह्यातील आरोपींनी फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे, अशी ही मागणी त्यांनी केली.महत्त्वाचे म्हणजे, या हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number