Lalbaugcha Raja Visarjan 2026: गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब? लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला, पण समुद्रात अडथळा…; विसर्जन कधी होणार?

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा देखील विलंब होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या.
Lalbaugcha Raja Visarjan 2026
Lalbaugcha Raja Visarjan 2026

महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारसा मानला जाणारा लालाबागचा राजा कालच विसर्जनासाठी गिरगावकडे मार्गस्थ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भावपूर्ण वातावरणात निघालेली लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीच्या आसपास पोहोचली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लाखो लोकांचे भावविश्व जोडलेले आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा देखील विलंब होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या. अडचणीमुळे लालबागचा राजा कित्येक तास चौपाटीवर होता. तसेच त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान आज यंदाही असेच काहीसे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लालबागचा राजा शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंडपातून विसर्जनासाठी निघाला होता. त्यानंतर लालबाग, भायखळा, गिरगाव असा मोठा प्रवास करत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाला आहे.

हेही वाचा- Prabhadevi Accident : भरधाव कार मिरवणुकीत घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक, 4 जण…; मुंबईच्या प्रभादेवीत विसर्जनादरम्यान थरारक घटना

मात्र आज समुद्राला पहिली ओहोटी पहाटे 5:22 वाजता आली आहे. त्यावेळी पाण्याची पातळी केवळ 0.97 मीटर इतकी होती. ओहोटीच्या काळात समुद्राची पातळी खूप खाली जाते. समुद्राचे पाणी तराफ्याच्या पातळीला पोहोचेपर्यंत लालबागचा राजाला तराफ्यावर चढवता येत नाही. त्यामुळे यंदाही लालबागचा राजाचे विसर्जन लांबू शकते. त्यामुळे लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी साधारण दुपारी 12 ते 1 वाजू शकतो. मात्र प्रशासन, स्वयंसेवक आणि भाविक यांच्या सहकार्याने विसर्जन सुरक्षितपणे पूर्ण होईल, अशी आशा आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटी दाखल
तर दुसरीकडे समुद्राला ओहोटी असल्यामुळे चिंचपोकळीचा चिंतामणी देखील गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचला असून विसर्जनासाठी तत्काळ ठेवण्यात आला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीही काल दुपारी एक वाजता मंडपातून निघाला होता. मात्र समुद्राला ओहोटी असल्यामुळे चिंतामणीच्या विसर्जनालाही विलंब लागण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version