दसरा-दिवाळीत झाडू का खरेदी करतात? लक्ष्मी प्रसन्न होण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

नवरात्रोत्सवातील विजयादशमी, अक्षय्य तृतीया, दिवाळी तसेच गुढीपाडवा अशा सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याची धार्मिक परंपरा आहे. यासोबतच दसरा आणि दिवाळीत झाडू खरेदी करण्याचीही प्रथा आहे.

दसरा-दिवाळीत झाडू का खरेदी करतात? लक्ष्मी प्रसन्न होण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

नवरात्रोत्सवातील विजयादशमी, अक्षय्य तृतीया, दिवाळी तसेच गुढीपाडवा अशा सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याची धार्मिक परंपरा आहे. यासोबतच दसरा आणि दिवाळीत झाडू खरेदी करण्याचीही प्रथा आहे. या काळात बाजारपेठांमध्ये झाडू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. पण दसरा आणि दिवाळीत झाडू का खरेदी करतात? यामागे केवळ परंपराच नाही, तर धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्राशी संबंधित काही मान्यताही आहेत. नेमक्या या मान्यता काय आहेत, ते जाणून घेऊया…

झाडू म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक
शास्त्रानुसार झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडू घरातील दारिद्र्य, नकारात्मकता आणि घाण बाहेर काढून स्वच्छता आणि समृद्धी आणतो. जिथे स्वच्छता असते, तिथेच लक्ष्मी वास करते, अशी मान्यता आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीला झाडू खरेदी करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरी आणण्यासारखे मानले जाते.

दसरा आणि दिवाळीलाच का खरेदी करतात?
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तर दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू खरेदी केल्यास वर्षभर घरात पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरातील अलक्ष्मी दूर होते.

हेही वाचा – दसऱ्याच्या तोरणात भाताच्या लोंब्या आणि आंब्याच्या पानांचा वापर का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

झाडू खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

1. कोणत्या दिवशी खरेदी करावा?

दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी झाडू खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. शनिवारी झाडू खरेदी करू नये, असे सांगितले जाते.

2. कसा झाडू घ्यावा?

नेहमी व्यवस्थित बांधलेला नवीन झाडू घ्यावा. तुटका-फुटका झाडू घेऊ नये.

3. झाडूची पूजा करावी:

नवीन झाडू घरी आणल्यावर त्याला हळद-कुंकू लावून त्याची पूजा करावी. त्यानंतरच तो वापरात आणावा.

4. झाडू कुठे ठेवावा?

झाडू नेहमी आडवा आणि लपवून ठेवावा. उभा ठेवू नये आणि घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा स्वयंपाकघरात ठेवू नये. झाडूवर कधीही पाय पडू देऊ नये.

धार्मिक परंपरेनुसार, या पद्धतीने झाडू खरेदी करून त्याचा सन्मान केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number