नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला, म्हणजेच शरद पौर्णिमेला, चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आवर्जून पाळली जाते. या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो आणि असे दूध प्यायल्याने आरोग्य चांगले राहते, अशी मान्यता आहे.
मात्र, चांदण्यात दूध ठेवताना नकळतपणे काही चुका होतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्रद्धेसोबतच स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कोणत्या चुका टाळाव्यात?
1. उघड्यावर दूध ठेवणे टाळा:
अनेकजण दुधाचे भांडे उघड्यावर ठेवतात. यामुळे हवेतील धूळ, किटक आणि बॅक्टेरिया दुधात जाऊ शकतात. त्यामुळे नेहमी पातळ मलमलच्या कपड्याने किंवा जाळीदार झाकणाने भांडे झाकून ठेवा.
2. प्लास्टिकच्या भांड्याचा वापर टाळा:
प्लास्टिकच्या भांड्यात दूध ठेवल्यास केमिकल रिॲक्शन होण्याची शक्यता असते. त्यासाठी काचेचे किंवा निर्जंतुक केलेले स्टीलचे भांडे वापरणे अधिक सुरक्षित आहे.
३. जास्त वेळ बाहेर ठेवू नका:
रात्रभर दूध बाहेर ठेवणे धोकादायक ठरू शकते. चंद्राची किरणे लागल्यानंतर २ ते ३ तासांत दूध घरात आणावे, अन्यथा ते नासण्याची शक्यता असते.
स्वच्छतेची काळजी कशी घ्याल?
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर –
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.