नवरात्री म्हणजे 9 दिवस उपवास, गरबा आणि दांडिया. या धावपळीत चेहऱ्यावर जास्त लेयर्सचा मेकअप नकोसा वाटतो, कारण गरबा खेळताना घामामुळे हेवी मेकअप खराब होतो आणि त्वचेचेही नुकसान होते. त्यामुळे सध्या नॅचरल आणि मिनिमल मेकअपला अधिक पसंती मिळत आहे. बॉलिवूडपासून ते मराठी अभिनेत्रींपर्यंत सर्वांचीच निवड ही ‘नो मेकअप-मेकअप लूक’ असतो.
नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी नॅचरल मेकअप कसा असावा, ते पाहूया:
मेकअपचे 3 गोल्डन रुल्स जाणून घ्या:
1. बेस हलका ठेवा.
2. डोळ्यांवर फोकस करा – काजळ आणि एकाच रंगाची आय-शॅडो पुरेशी आहे.
3. ओठांवर नैसर्गिक रंग – न्यूड किंवा लाईट पिंक शेड निवडा.
9 दिवसांचे 9 नॅचरल लूक:
पहिला व दुसरा दिवस – पांढरा / लाल: लाईट बेस, काळं काजळ, लाल टिकली आणि लाल लिपस्टिकचा हलकासा टच.
तिसरा व चौथा दिवस – रॉयल ब्लू / पिवळा: निळ्या लायनरचा पातळ स्ट्रोक, गालावर पीच ब्लश आणि नैसर्गिक ओठांचा रंग. गरब्यात हा लूक खूप उठून दिसतो.
पाचवा व सहावा दिवस – हिरवा / राखाडी: हिरव्या साडीवर हिरवी आय-शॅडो टाळा. फक्त मस्कारा, हायलायटर आणि ब्राऊन लिपस्टिक लावा.
हेही वाचा – नवरात्रीचा उपवास करताय? ‘या’ 9 चुका टाळा; देवीची साधना करताना काय कराल, काय टाळाल?
सातवा व आठवा दिवस – नारंगी / मोरपंखी: ऑरेंज ब्लश आणि मोरपंखी रंगाच्या टिकलीने लूक पूर्ण करा. ओठांसाठी कोरल शेड बेस्ट आहे.
नववा दिवस – गुलाबी: शेवटच्या दिवशी गुलाबी साडी, गुलाबी ब्लश आणि हलका गुलाबी लिप-टिंट लावून एकदम फ्रेश लूक मिळवा.
प्रो-टीप: गरबा खेळताना मेकअप टिकून राहण्यासाठी शेवटी सेटिंग स्प्रे नक्की वापरा आणि केसांमध्ये गजरा माळा, तो तुमच्या नॅचरल लूकला परफेक्ट ट्रेडिशनल टच देईल.