नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम आणि अटी

नवरात्रौत्सवातील नऊ दिवसांच्या उपवासाचे महत्त्व, उपवास कसे करावे, नियम आणि अटी.
navratri festival fast rules
navratri festival fast rules

शारदीय नवरात्रौत्सवाला आज, ११ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. देवीच्या घटस्थापनेसोबतच अनेक जण नऊ दिवस उपवास देखील धरतात. या उत्सवात नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. विधीवत आणि मनोभावे पूजा केली तर दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, असे म्हणतात. देवीची कृपादृष्टी व्हावी, यासाठी नवरात्रीतील व्रताच्या नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

नवरात्रीच्या उपवासामध्ये काय करावे?

1. व्रताचा संकल्प
नवरात्रीच्या व्रतास सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा. नवरात्रीचे व्रत एक वेळेस भोजन करुन करायचे आहे की केवळ फलाहार करायचाय, याचा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मनामध्ये देवीप्रति श्रद्धा आणि भक्ती खरी असणे आवश्यक आहे. तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन करावे.

2. भक्ती आणि प्रार्थना
नवरात्रौत्सवामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधीवत पूजा करावी. देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित करावा.

3. ध्यान, मंत्रांचा जप आणि दानधर्म
उपवासादरम्यान मन शुद्ध ठेवावे, यासाठी ध्यानधारणा आणि मंत्रांचा जप करावा. या काळात दान करण्यासही विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण आवर्जून करावे. तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा.

4. सात्विक भोजन
उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजनाचे सेवन करावे. यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा.

5. ब्रह्मचर्य व्रताचे नियम
सत्य बोलावे, मनावर संयम ठेवावा, देवीमातेच्या मंत्रांचा जप करावा. ब्रह्मचर्य व्रताच्या नियमांचे पालन करावे.

6. सैंधव मीठ
दैनंदिन वापरातील मिठाऐवजी आहारामध्ये सैंधव मिठाचा समावेश करावा. फराळाच्या पदार्थांमध्ये सैंधव मीठ वापरावे, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

7. स्वच्छता पाळावी
उपवासादरम्यान घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. ज्या घरात स्वच्छता असते, तेथे देवी लक्ष्मीचा निवास असतो आणि घरामध्ये समृद्धी येते, असे म्हणतात.

नवरात्रीच्या व्रतादरम्यान या गोष्टी करणे टाळावे

1. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. खोटे बोलणे, रागराग करणे टाळावे.
2. मद्यपान, मांसाहार करणे टाळावे. तामसिक भोजनाचे सेवन करू नये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version