Karwachauth 2025 : लग्नानंतर चित्रपट सृष्टीतील 'या' सेलिब्रिटींचा आहे पहिला करवा चौथ
करवा चौथ 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा पहिलाच करवा चौथ आहे.
प्रसिद्ध गायक दर्शन रावल आणि धरल सुरेलियाचा पहिलाच करवा चौथ असेल. दोघांनी 18 जानेवरी 2025 मध्ये लग्न केले होते.
बालिका वधू मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर यावर्षी तिचा पती मिलिंद चंदवानीसोबत पहिला करवाचौथ साजरा करणार आहे.
जादुई आवाजानं तरुणाईला वेड लावणारा गायक अरमान मलिक हा पत्नी आशना श्रॉफसोबत करवा चौथ साजरा करणार आहे.
अभिनेता रणबीर कपूरचा आत्ते भाऊ आदर जैन आणि त्याची पत्नी अलेखा अडवानीचा हा पहिला करवाचौथ असेल.
प्रतीक बब्बर आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी यांचा फेब्रुवारी 2025 मध्ये विवाह झाला होता. यावर्षी दोघे त्यांचा पहिला करवा चौथ एकत्र साजरा करतील.